Home Breaking News भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्त ‘बालदिन ‘हिंदी माध्य मिक...

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्त ‘बालदिन ‘हिंदी माध्य मिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको मध्ये मोठ्या उत्साहात साजरा 

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज मो. नंबर – 8983319070

आज 14 नोव्हेंबर, 2024 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त ‘बालदिन’ हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कला गुण साजरे केले. यात विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्यावर आधारित भाषणे, बाल गीतावर आधारित नृत्य सादर केले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य .अलगट व्ही. के. सर,  बापू शेरेकर सर,. चौधरी सर यांनी बालकविता मुलांसमोर सादर केल्या.जे.टी. नागरे मॅडम यांनी चाचा नेहरू यांच्यावर आधारित गोष्ट मुलांना सांगितली. प्रतिमा पूजन चाचा नेहरू यांची वेशभूषा करून आलेले विद्यार्थी यांनी केले. विद्यार्थ्यांच्या बाल नृत्याची तयारी  रेखा धात्रक मॅडम व जाधव मॅडम यांनी करून घेतली. तसेच आभार प्रदर्शन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका माया नाईक मॅडम यांनी केले.याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Previous articleग्रामीण भागात देशी दारुचा महापुर.
Next articleपाच पाच मिनीटाला लाईट जाते साहेब, काहीतरी करा.