👉 पोलीसांचे दुर्लक्ष
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 13 नोव्हेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागात विनापरवाना ऐन निवडणुकीच्या काळात देशीदारु ( भिंगरी) एकदम जोरात खुलेआमपणे देशीदारू विकत आहेत. त्यांच्यावर मायेपोटी पोलीस प्रशासनाने साफ दुर्लक्ष करत आहेत. असा सवना ज., रमणवाडी, वाशी, एकघरी, पारडी ज., चिर्चोर्डी, जिरोणा, दगडवाडी, महादापुर, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा आदी आदिवासी बहुल भागात विना परवाना देशीदारु विक्रेते फारच जोमात दिसत आहेत.
सवना ज. येथे एक महिला खुलेआमपणे देशी दारु विकते. त्यांच्यांच सोबतीला गावातील अनेक तरुणाने देशीदारु विक्रीचे दुकान थाटले आहे.
नांदेड हा पुर्वीचा सुसंस्कृत कवि, लेखक, विचारवंत, कादंबरीकार , महापुरुषांचा पराक्रम केलेला जिल्हा पण संबंध नांदेड आज विशेष:या हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात आजरोजी निवडणुकीच्या काळात देशीदारु जोमात विक्री होतांना दिसत आहे. या विनापरवाना देशीदारु विक्रेत्यांना हिमायतनगर पोलीस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक हे खरंच ग्रामीण भागातील विनापरवाना देशीदारु विक्रेत्यांना जेलची हवा कधी दाखविणार? असा प्रश्न हिमायतनगरचे मुख्य पोलीस निरीक्षक यांना हिमायतनगर तालुक्यातील अनेक विधवा महिलेने विचारला आहे.