हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
मागास प्रवर्गातील ज्या विध्यार्थ्यांचे व्यवसायिक अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्यासाठी जातप्रमाणपत्र प्रलंबीत आहेत, अशांसाठी समितीच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन 14 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नाशिक येथे केले असून संबंधित विध्यार्थ्यानी या मोहिमेत वरील तारखेला मुळ कागदपत्रा सह दुपारी 12 ते चार या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित राहुन आपल्या प्रमाणपत्रानं साठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची संधी मिळाली आहे.
2024 -25 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैधकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी व बी. एड. या व्यावसायिक, अभ्यासक्रमांना एसईबीसी, अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, व विशेष मागास प्रवर्ग या मागास प्रवर्गातील विध्यार्थ्यांना आरक्षित प्रवर्गातून प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी अर्ज ही केलेत, परंतु अनेकांना प्रमाणपत्रच मिळाले नाही व अर्जही प्रलंबीत आहेत अशा विध्यार्थ्यांसाठी हे विशेष त्रुटी पूर्तता मोहीम आयोजित केल्याची माहिती समितीचे संशोधन अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
(अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघ, नाशिक )
प्रतिक्रिया -:
नाशिक जिल्हा जात पडताळणी समितीने विध्यार्थ्यांना सुलभपणे जातप्रमाणपत्र मिळावे या करीता ही जी मोहीम आयोजित केली आहे, ती अत्यंत स्वागतार्थ बाब आहे. कारण या माध्यमातून अनेक गरीब विध्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे स्वप्न वारंवार जातप्रमाण पत्र मिळवण्यासाठी चकरा मारण्याचे व आर्थिक झळ सोसण्याचे वाचून पूर्ण होणार आहे.
ज्या प्रमाणे विध्यार्थ्यांन साठी ही मोहीम राबवली जात आहे, त्याच प्रमाणे शासकीय, निमशासकीय, शिक्षक यांच्या प्रलंबीत जात प्रमाणपत्रा साठी सुद्धा अशी विशेष मोहीम राबवावी अशी आमच्या संघटनेची मागणी आहे