वाशी व एकघरी येथील शेतकर्यांचा महावितरण कंपनी वर धड़क मोर्चा…
अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी
हिमायतनगर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांन कडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष पणा मुळे आज हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे.
सविस्तर असे की हिमायतनगर तालुक्यातील वाशी,एकघरी,बोरगडी,सह तालुक्यातील शेत शिवार परिसरात पिकाला पाणी देण्याच्या मोटार ला महावितरण कडू लाईट मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. याचे कारण असे की शेतातील पिके हाताला येण्याचे ऐन वेळी शेतातील पिकांना पाणी देणारी मोटार ला लाईट मिळत नसल्याने पिके खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, शेवटच्या महिन्यात पावसाळ्यात पाणी पडले नसल्याने उभे पिकांचे नुकसान होत आहे,
त्यात काही शेतकरी यांच्या कडे विहीर बोर आहे, ते त्या विहीर व बोअर चे पाणी पिकाला देऊन पिके वाचविण्याचे प्रयत्न करीत आहे,
पण लाईट वेळेवर मिळत नाही व लाईट राहिली तरी व्होल्टेज मिळत नसल्याने सध्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी मोटार चालू होत नाही, पिकाला पाणी नसल्याने पिके पिवळे पडून लागले आसल्याने
तालुक्यातील बरेच शिवारातील शेतांमध्ये पिकाला पाणी देण्यासाठी लाईट रात्रीचे 8 तास मिळत आहे व त्या 8 तासात मोटारीला व्होल्टेज मिळत नसल्याने हाताला आलेल्या पिकांची नुकसानी होत असल्याची माहिती शेतकऱ्या कडून मिळाली आहे,
व त्या शिवारातील सर्व शेतकरी महावितरणला तक्रार करून उपोषणास बसणार
असल्याची माहिती दिली आहे..