हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज
मो. नंबर – 8983319070
कोणे एके काळी शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिक जिल्हा,की ज्या जिल्ह्याने शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापण केले होते तेव्हा सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा देऊन शरद पवार यांच सरकार बनवन्यात व त्यांना मुख्यमंत्री करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फुट पडायच्या अगोदर सहा जागा शरद पवार यांच्या ताब्यात राहिल्या. परंतु फुट पडल्या नंतर या सहाच्या सहा जागा अजित पवार यांच्या गटाकडे गेल्याने अजित पवार यांची नाशिक जिल्ह्यात राजकीय ताकद वाढली आहे.
त्यातच आता काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांनी देखील अजित पवार यांच्या गटाचा रस्ता पकडून विधान सभेची उमेदवारी पदरात पाडून घेतली त्यामुळे सधस्थिती मध्ये नाशिक जिल्यात सर्वधिक 7 आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे आहेत.
या जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी शरद पवार यांच्या 12 व 13 नोव्हेबर रोजी अनुक्रमे कळवण, दिंडोरी, निफाड, व नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघा तील आडगाव या ठिकाणी जाहीर प्रचार सभा होणार आहेत.
आपल्या काकाला राजकीय प्रतिउत्तर देण्यासाठी पाठोपाठ त्यांचे पुतणे अजित पवार 14 व 15 रोजी नाशिक मध्ये तळ ठोकणार असून दिंडोरी, सिन्नर, निफाड, येवला, इगतपुरी, देवळाली या ठिकाणी त्यांच्या जाहीर प्रचार सभा होवून हा कलगीतुरा रंगणार आहे.