मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08 नोव्हेंबर 2024
हिमायतनगर येथुन नांदेड, किनवट, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे येणा-या- जाणा-या प्रवाशांची संख्या जास्त आहे. विदर्भ, तेलगणा आदी भागातील नागरीक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी नांदेडला जातात आणी येतात. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ या स्थानकावर दिसुन येते. परंतु केद्रंशासनानी या रेल्वेस्थानकांचा विकास करण्यासाठी खुप मोठया थाटात विकासकामांचे भुमीभुजन केले. मात्र प्रत्यक्षात या स्थानकावर प्रवाशांना बसण्यासाठी सावलीसाठी शेड उभारण्याचे काम अपुर्ण असल्यामुळे, प्रवाशांना मात्र रेल्वेची प्रतिक्षा करण्यासाठी तळपत्या उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. याबद्दल प्रवाशांनी त्रिव नाराजी व्यक्त केली आहे.
👉 शोचालयाची व्यवस्था नाही.
या रेल्वेस्थानकावर दिव्यागांचे शोचालय कुलुपबंद अवस्थेत दिसुन आले आहे. इतकेच नव्हेतर प्रवाशांना पाणी पिण्यासाठी नळाला पाणी सुध्दा नाही.
त्वरीत या रेल्वेस्थावरील अपुर्ण शेडचे काम लवकरात लवकर पुर्ण करून, पिण्याच्या पाणी उपलब्ध करुन, शोचालयाची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.