मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड
हिमायतनगर तालुक्यातील मौजे निरंजनी येथील दिपावली सनानिमित्ताने जुन्या मित्र एकत्र खरबावरील क्रिकेट मित्र हा गेटटुगेदर चांगल्या उत्साहात पार पाडला आहे.
दोन महिन्यापुर्वी डॉ किरण करेवाड यांनी संकल्पना सांगितली की आपण २० वर्षापूर्वी या खर्बाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होतो आणि त्या वेळेस हे मैदान साफसुञ आणि खेळाने भरभरून वाटायचे परंतू आज मात्र या मैदानाची आवस्था एखाद्या अनाथ मुलासारखी झाली आहे.
आताच्या मुलांची अवस्था पाहिली तर प्रत्येक जण मोबाईलला चिटकून बसलेला आहे त्या मोबाईल वरील इंस्टाग्राम, फेसबुक, वाट्सअप व इतरत्र वाईट वेसनामध्ये अडकलेला आहे. खेळच विसरल्यागत झाले आहे
जे तरून वाईट मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत आहेत अशांना खरबा वरील क्रिकेट मित्र गेट-टुगेदर ही संकल्पना आत्मसात करून प्रत्यक्षात कृतीत उतरवण्याचे ठामले आहे.
प्रत्येक तरुण वाईट मार्गापासून दुरावला पाहिजे, शरीर स्वास्थाकडे लक्ष दिले पाहिजे, शरीर तंदुरुस्त राहिले पाहिजे, चांगल्या सवयी आत्मसात करण्याची मानसिकता तयार झाली पाहिजे, त्याला त्याचं जीवन निरोगी राहून चांगल्या प्रकारे जगता आलं पाहिजे, अशा अनेक चांगल्या सवयी प्रत्येक तरुणांनी जोपासल्या पाहिजे. यासाठी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता या दिवाळीच्या सनाच्या दिवसी आपल्या गावचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड यांच्या वाढ दिवसा निमित्त सर्व सीनियर ज्युनिअर मित्रांच्या सहकार्याने नविन पिढीला चांगला मॅसेज देऊन हा प्रोग्राम चांगल्या रितीने पार पाडलेला आहे.
ज्यामध्ये आमचे सिनिअर मित्र घोडके सर ,वाठोरे सर , लक्ष्मण दादा, आडेलु सुंकुरवाड, माधव कागळे व इतरजन आणि माझे बॅचमेन्ट डॉ किरण व नितीन ऊर्फ गोलू, सरपंच पवन करेवाड यांनी आपल्या मार्गदर्शनातून मागील पिढीला चांगला संदेश, चांगला मॅसेज देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर आम्ही इतर सर्वच मित्रांनी यामध्ये सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे सहकार्य केल आहे.
तसेच हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी अनेक छोटे-मोठे उपक्रम राबवली जातात,
जसे की, 8 एप्रिल 2023 मध्ये माझे वडील कैलासवासी किशन वासुदेव यांच्या स्मरणार्थ भव्य असा जंगी कुस्त्याचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. या माध्यमातून बलोपासनेपासून दुरावणाऱ्या बऱ्याच तरुणावर चांगला परिणाम पडलेला आहे. आता गावामध्ये बरेच कुस्त्याचे आखाडे चालत आहेत. बरेच तरुण व्यसनापासून मुक्त झाले असून त्यांना कुस्त्याचा नाद लागलेला आहे. त्याचबरोबर आपलं गाव स्वच्छ निर्मळ सुंदर राहण्यासाठी या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे. त्याचबरोबर जुलै 2022 मध्ये तालुक्यातील बारा गावामधील शाळेमध्ये बाल उजळणी पुस्तकांचे वाटप सुद्धा केलेले आहे. अशा प्रकारे अनेक उपक्रम समाजाच्या सेवेसाठी निस्वार्थपणे राबवले जातात.
सांगण्याचा उद्देश असा की आज जसे दिपावली सनाच्या दिवसी खरबावरील क्रिकेट मित्र या गेट-टुगेदर च्या निमित्ताने सर्वच मित्र एकत्र येऊन आपला आनंद द्विगुणीत करून, एकमेकांशी स्नेहाने, प्रेमाने, आपुलकीने दिवाळी सण साजरा केलेला आहे व इतरांना नवीन चांगला संदेश दिलेला आहे. यापुढेही असेच आपले प्रेम, आपुलकी कायम राहील.
आज दिवाळी निमित्त आपल्या गावाच्या खरबावर जो क्रिकेटचा सोहळा झाला तो खरच अविस्मरणीय होता. कोणतेही मोठे उच्च नियोजन नसतांना अचानक मनात आलेल्या संकल्पनेचे कमी वेळात मित्रांच्या सांघिक योगदानाने उत्कृष्ट आयोजन झाले याचे खरच मोठे समाधान आहे.
आपल्यात सर्व खेळ भावना जपून २ छान मैत्रीपूर्ण सामने झाले. सर्वांनी चांगली कामगिरी केली.
दोन्ही सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशी अष्टपैलू कामगिरी करत आपले मित्र नितीन राऊत हे आजचे “मालिकावीर” झाले याबद्दल त्यांचे अभिनंदन.
दोन सामने जिंकून बेभरोसे क्रिकेट संघाचे कर्णधार आदरणीय श्री घोडगे सर यांनी प्राप्त केलेली सर्व बक्षीस रक्कम ही धर्मदाय कार्यासाठी हिरण्यगर्भ बहुउद्देशीय प्रतिष्ठाण ला डोनेट करुन एक आदर्शपण सिध्द केले. पुर्ण दिवसातला हा क्षण खरच खुप भावनिक आणि सदैव मनात राहणारा आहे.
– आपले सरपंच प्रतिनिधी, माझे धाकटे बंधू श्री पवन करेवाड व त्यांचे मित्र मंडळ यांनी आपल्या खरबाच्या मैदानाला खेळण्यालायक बनवले त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच.
– आपले मित्र, तेज गोलंदाज आणि तालुक्यातील एक नावाजलेले पत्रकार बंधू श्री धम्मपाल मुन्नेश्वर यांनी आपली मंडप डेकोरेशन, साऊंड सर्विस सांगण्यावरून तुर्तास आणि विशेष म्हणजे निशुल्क पणे उभी केली त्यामुळे त्यांचे खुप खुप धन्यवाद.
– खिचडी बनविण्यासाठी पवन चे मित्र मंडळ प्रल्हाद, ज्ञानू, लक्ष्मण, अक्षय व इतर यांनी योगदान दिले त्यांचे आभार.
– आपल्या गावाला क्रिकेट चा वारसा देणारे श्री लक्ष्मण लिंगमपल्ली, श्री माधव कागळे, श्री चंद्रकांत घोडगे सर, श्री रमेश वाठोरे सर, श्री आडेलु सुंकुरवाड आणि संदिप कटकाळू यांनी वेळातला वेळ काढून उपस्थित दर्शवली आणि मार्गदर्शनाने हा सोहळा घडून आणला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
– आपले मित्र डॉ. अमोल सोमसेटवार, नितिन राऊत, केरबा, राजेश, सुनिल दा, धम्मा,आनंद दा, गणेश, रामेश्वर, हरीदास, यांनी आवर्जून उपस्थित राहुन या सोहळ्याची शोभा वाढवली.
– या सोहळ्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रितीने योगदान देणाऱ्या इतर सर्व मित्रांचे आभार.
– सर्व तरुण खेळाडूंचे आभार आणि आपल्या गावात क्रिकेट हा खेळ जीवंत ठेवण्यासाठी शुभेच्छा.