Home Breaking News शेतकरी पुत्रास वंचीतने दिली विधानसभेची उमेदवारी…

शेतकरी पुत्रास वंचीतने दिली विधानसभेची उमेदवारी…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 ऑक्टोबर 2024

 

संबंध महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. हदगांव- हिमायतनगर विधानसभेचा पहिला उमेदवार वंचित बहुजन आघाडीने जाहीर केला आहे. अतिदुर्गम भागातुन आलेल्या वडीलोपार्जीत शेती करणा-या एका उच्चशिक्षीत, सामाजिक कार्यकर्त्याला हदगांव- हिमायतनगर विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसुन आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. दिलीप राठोड यांनी विधानसभेचे तिकिट मिळाल्यामुळे हिमायतनगर येथे कार्यक्रत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले आहे. शिप्रा या सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये महिलांना बचत गटाच्या माध्यमातुन महिला सक्षमीकरण, अनेक बेरोजगारांना संस्थेच्या माध्यमातुन रोजगार मिळवुन दिला आहे. हिमायतनगर तालुक्यात शिक्षणसंस्था उभारुन गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी मजुरदारांची मुले,मुली शिक्षणापासुन वंचित राहु नये. यासाठी सतत प्रयंत्न केले आहेत. एकंदरीतच वंचित बहुजन आघाडीने शेतकरी पुत्रास हदगांव- हिमायतनगर विधानसभेची उमेदवारी देऊन सन्मान केला आहे. अशी मतदारसंघात जोरदार चर्चा आहे.

Previous articleहिमायतनगर तालुका व शहराच्या विकासाचे राजकीय नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे वाजले तीन तेरा