Home Breaking News अतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या कपाशीचे अतोनात नुकसान.

अतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या कपाशीचे अतोनात नुकसान.

हिमायतनगर तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः: धुमाकुळ घातला आहे.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 20 ऑक्टोबर 2024

सद्या कपाशीच्या पिकांची बोंड हि पांढरीशुभ्र फुटल्याने वेचणी साठी मजुर मिळत नाही. म्हणुन कापुस वेचणीस वेळ लागत आहे. तब्बल एक महिन्याच्या अंतराने ग्रामीण भागात रात्रीबेरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस मुसळधार पडत आहे. शेताच्या हातातोंडाशी आलेला घास बळीराजाला सुखाचे दिवस पाहु देत नाही. यामध्ये शेतक-यांचे आर्थीक गणीत कोलमडणार हे मात्र निश्चित आहे. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत.

या खरीप हंगामात शंभर टक्के नुकसान होऊन सुध्दा पिकविमा कंपनीकडुन अजुनप्रयंत शेतक-यांना एक रुपयांची मदत मिळत नाही. हिमायतनगर तालुक्यातील आमदाकीचे डोहाळे लागलेल्या नेत्यांनी आजतागायत कुठल्याच आवाज शासनदरबारी बळीराजासाठी उठविला नाही. हि शोकांतिका म्हणावी लागेल. असेही शेतकरी आवर्जुन सांगत आहेत.

Previous articleआमदार जवळगावकरांना पक्षातील महिला जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान …..
Next articleलहरी पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीन पिक पाण्याखाली