Home Breaking News आमदार जवळगावकरांना पक्षातील महिला जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान …..

आमदार जवळगावकरांना पक्षातील महिला जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान …..

हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुकांची दिल्लीमध्ये फील्डिंग सुरू ; महाविकास आघाडीच्या तिकिटाचा पेच कायम

हिमायतनगर -:अंगद सुरोशे

हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे पण महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी उमेदवारांनी दिल्ली दरबारी फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक व काँग्रेस पक्षाचे विश्वजीत कदम यांची महाराष्ट्रातील महिला काँग्रेस आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष संध्याकाळी सव्वालाखे व प्रदेश उपाध्यक्ष सौ.डॉ. रेखाताई चव्हाण यांनी त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून हदगाव हिमायतनगर विधानसभेची जागा ही महिला काँग्रेस ला देण्यात यावी असा त्यांच्या कडे आग्रह धरल्याचे समजत आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना काँग्रेस पक्षाच्या नांदेड महिला आघाडीच्या प्रभारी जिल्हा अध्यक्ष चव्हाण यांनी खुले आव्हान दिल्याचे समजत आहे.त्यामुळे ह्या तिकीटाचा पेच सध्या तरी सूटलेला दिसून येत नाही त्यामुळे कार्यकर्ते मात्र संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे..

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून विविध पक्षाच्या अनेक नेत्यांनी आप आपल्या पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच हदगाव हिमायतनगर विधानसभा ही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्यामुळे काँग्रेस पक्षांमध्ये अकरा उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचे दिसून येत आहे. सर्व इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे मुलाखती सुद्धा दिल्या आहेत.

दरम्यान विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरोधात मतदान केल्याचा संशय नांदेड मधील काही काँग्रेस आमदारांवर पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला होता.त्यात हदगावचे आमदार जवळगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून जिल्हा सह मराठवाड्यात ओळखले जातात. काँग्रेस पक्षाच्या बंडखोरी मध्ये आमदार जवळगावकरांचे नाव असल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला होता.त्यामुळे महिला काँग्रेस आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण यांनी या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार त्यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला व मतदारांच्या गाठीभेटी घेत नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या त्यामुळे डॉ.रेखाताई चव्हाण हे एक उच्चशिक्षित उमेदवार म्हणून मतदारसंघात ओळखल्या जात आहेत. त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभेतील महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे.काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षासह सौ.डॉ. रेखाताई चव्हाण ह्या थेट दिल्ली दरबारी जाऊन काँग्रेसचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक यांची त्यांनी भेट घेऊन हदगाव हिमायतनगर विधानसभेची उमेदवारी महिला आघाडींना देण्यात यावी असा आग्रह त्यांनी धरल्याचे समजत आहे. त्यामुळे वेळेवर आमदार जवळगावकर यांचा पत्ता कट होणार की काय ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहे.

Previous articleहदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील  
Next articleअतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या कपाशीचे अतोनात नुकसान.