हिमायतनगरात युवासेनेचा संवाद मेळावा; नवनिर्वाचित आमदार हेमंत पाटील यांचा सत्कार संपन्न
अंगद सुरोशे हिमायतनगर – प्रतिनीधी
आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने केले नाही ती सर्व कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी केली आहेत. मोठ-मोठे बंधारे, बेरेजेस यासह ग्रामीण भागातील लहान रस्ते मुख्य रस्त्याला जोडून दळणवळणाचा मार्ग मोकळा केला आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, जेष्ठ नागरिक, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, विविध महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक घडविण्यासह विविध कामे करत, सर्व प्रकारच्या घटकांना न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा आशीर्वाद मिळून हदगाव हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेचाच भगवा फडकेल असा ठाम विश्वास विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार हेमंतभाऊ पाटील यांनी व्यक्त केला.
ते हिमायतनगर येथील साईबाबा मंदिराच्या परीसरात दिनांक १९ शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या युवासेनेच्या संवाद मेळाव्यात उपस्थित युवासेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, आदिवासी समाजचे नेते दादाराव टारपे, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शीतल पाटील, डॉ.दीपक नाईक, प्रा.कैलास राठोड, तालूका प्रमुख रामभाऊ ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर पुट्ठेवार, हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी आमदार हेमंतभाऊ पाटील यांचे आगमन होताच हिमायतनगर तालुक्याच्या वतीने युवा शिवसैनिकांनी फटाक्याची आतषबाजी करत जंगी स्वागत केले.
पुढे बोलताना हेमंतभाऊ म्हणाले कि, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर युवकांच संघटन मजबुत करण्यासाठी युवासेना संवाद मेळाव्याच आयोजन केल जात आहे, त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी युवासेना संवाद मेळावा घेण्यात येत आहे. सर्व युवकांनी आत्तापासून कामाला लागून युवकांच संघटन गावपातळीवर मजबूत करून विधानसभेवर भगवा फडकवावा. यासाठी तरुणांची प्रत्यक्ष काम करण्यावर भर द्यावा असे आवाहनही त्यांनी केले. हदगाव हिमायतनगर विधानसभेची जागा शिवसेनेची आहे असा दावा करत, याठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल असा आशावाद व्यक्त केला.
आजारी महिलेचा जीव वाचल्याबद्दल मुस्लीम कुटूंबाकडुन आभार
हिमायतनगर शहरातील एका मुस्लीम महिलेला दुर्धर आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. उपचारास खर्च परवडत नसल्याने त्यांनी या भागाचा खासदार असतांना मदतीची मागणी केली होती. त्यांनी मागणी केल्या प्रमाणे त्यांना योग्य ते सहकार्य करून पंतप्रधान सहाय्यता निधीतुन तीन लाख रूपयाचा निधी मंजुर करून दिला होता. आता तब्यत ठणठणीत झाल्याने त्यांनी कुटूंबासह कार्यक्रम स्थळी भेटुन आभार मानले, यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचा भाव डोळ्यात आस्व तरारली होती… पुढेही मदत लागलास नक्की करेन असा शब्द दिला.