Home Breaking News कॉग्रेसला अकोला जिल्ह्यात मोठा झटका

कॉग्रेसला अकोला जिल्ह्यात मोठा झटका

ब्रेकींग न्यूज : कॉंग्रेसचे बाळापूर (जि.अकोला) चे माजी आमदार मा खतीब सय्यद नातीकोद्दीन साहेब यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.पक्षाकडून त्यांना बाळापूरची उमेदवारी जाहीर.राज्याध्यक्ष मा रेखाताई ठाकूर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज वि.स.च्या 10 मतदारसंघात 10 मुस्लिम समाजातील उमेदवारांची घोषणा केली. याआधी नांदेड या वि.स.मतदारसंघा करीता पक्षाने मा फारूक अहमद यांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकी करीता घोषणा केलेल्या मुस्लिम समाजातील उमेदवारांची संख्या आता 11 झाली आहे.

दि.21 सप्टेंबर रोजी पक्षाध्यक्ष मा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा निवडणूक 2024 करीता 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पक्षाने असे एकुण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

●माजी आमदार खतीब यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा●

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने एकाही मतदारसंघात मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती. कॉंग्रेस पक्षातील अनेक मुस्लिम नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या धोरणाबद्दल जाहीरपणे टिका केली होती. ” कॉंग्रेस पक्षाला मुस्लिमांचे केवळ मतदान पाहिजे. उमेदवारी देतांना मात्र हात आखडता घेते.” अशापध्दीने रोष व्यक्त करत काही पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचे राजीनामे सुध्दा कॉंग्रेसकडे दिले होते.

या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील कॉंग्रेसचे माजी आमदार मा खतीब सय्यद नातीकोद्दीन साहेब यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला आहे. मा खतीब साहेब हे कॉंग्रेस पहाचे वरिष्ठ आणि जेष्ठ नेते आहेत. माजी आमदार खतीब साहेब हे कॉंग्रेसचे आमदार राहलेले आहेत. बाळापूरची नगर परिषदेत सातत्याने त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. जिल्ह्यात त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. मा खतीब साहेब यांच्या पक्षप्रवेशाने अकोला जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील राजकीय समिकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील आणि त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला सहा मतदारसंघात निश्चित होईल अशी परिस्थिती आहे.

कॉंग्रेस पक्ष व पार्यायाने महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमिका संधीसाधू राहिलेली दिसून येते. लोकसभा निवडणुकी नंतर संसदेत जेंव्हा वक्फ बोर्डाचे बील आले होते तेंव्हा कॉंग्रेस व मित्र पक्षांनी भाजपाला पुरक भूमिका घेत मुग गिळून घेतल्याची भूमिका घेतलेली पाहायला मिळाली. त्यामुळे मुस्लिम समाजाचा कॉंग्रेस व मित्र पक्षाबद्दल भ्रमनिरास झाला आहे.

सुरेश रा शिरसाट, अकोला दि.9.10.2024 आभार फेसबुक यांच्या वालवरून

Previous articleसस्ती येथील प्रवाशी यांच्या क्रूझर गाडीचा अपघात
Next articleजलंब माटरगाव शिवार संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान