Home Breaking News सस्ती येथील प्रवाशी यांच्या क्रूझर गाडीचा अपघात

सस्ती येथील प्रवाशी यांच्या क्रूझर गाडीचा अपघात

सुदैवाने कोणतीही जिवहाणी नाही 

योगेश ज्ञानदेव घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला मो 8888872854

शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आनंदानी पेट्रोल पंपासमोर पातूरकडून नागरतास येथे दर्शनासाठी जात भरधाव वेगात जात असलेल्या क्रुझर वाहनाचा अपघात झाला असून एक जण गंभीर असून सहा जखमी झाल्याची घटना घडली आहे.

आज दि.7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास पातूर पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदानी पेट्रोल पंपासमोरील उडान पुलाखाली भरधाव वेगात जात असलेल्या वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने एम.एच. 29 एडी 5742 क्रमांकाची कुझर गाडीला दोन पलट्या झाल्याने जोरदार अपघात झाला असून या अपघातामध्ये गाडीतील प्रवासी असलेल्या बेबीबाई शेळके (वय 60) हे गंभीर जखमी असून सहप्रवासी असलेले प्रदीप महल्ले, प्रियंका शेळके (वय 27), सुनंदा शेळके (वय 52), ऊर्मिला राऊत (54), पार्थ शेळके (6), रेणुका शेळके (वय 44), मंदा शेळके (वय 65) सर्व राहणार *सस्ती* , ता. पातूर हे जखमी झाले.

Previous articleहिमायतनगर शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख पदी संतोष नरवाडे तर शहर संघटक पदी शंकर चलमेलवर यांची नियुक्ती …
Next articleकॉग्रेसला अकोला जिल्ह्यात मोठा झटका