Home Breaking News उपविभागीय कार्यालयावर धडकला ओबीसींचा निषेध मोर्चा.

उपविभागीय कार्यालयावर धडकला ओबीसींचा निषेध मोर्चा.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 05 ऑक्टोबर 2024

ओबीसी संघर्ष योध्दा प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी सम ाज, लोहा-कंधारच्या वतीने शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या भव्य निषेध मोचनि कंधारवासियांचे लक्ष वेधून घेतले होते.

ओबीसी योध्दा प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी पुणे येथे काही समाजकंटकांनी भ्याड जिवघेणा हल्ला केला. तसेच त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज, लोहा कंधारच्या वतीने शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चाला सकाळी ११ वाजता माईचे मंदिर, साठेनगर, कंधार येथून सुरुवात झाली. हा मोर्चा प्रियदर्शिनीनगर, बौद्ध व्दारवेस, छ. शिवाजी म हाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, उपकोषागार कार्यालय मार्गे कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर या भव्य निषेध मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी अनेक मान्यवरांनी मोर्चाला संबोधित केले. तसेच या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार रेखा चामणर यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

या मोर्चामध्ये ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजय पवार, कंधार पं.स.चे माजी सभापती श्रीराम डुबकवाड, कंधार पं.स.चे

माजी सदस्य उत्तम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. अंगद केंद्रे, कुंभार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीराम तेलंग, माजी सैनिक विकास समितीचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष वैजनाथ गिरी, आंबुलग्याचे सरपंच प्रतिनिधी माधव मुसळे, नागारवाडीची माजी सरपंच पम लबाई मुंडे, लोहा कृउबा समितीचे संचालक केरबा केंद्रे, लोहा कृउबा समितीचे संचालक केशव तिडके, लोहा भाजप ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष अर्जुन राठोड, लोहा पं.स.चे माजी सदस्य परशुराम वडजे, लिंगायत समाजाचे नेते बबन हुलसुरे, डॉ. वैजनाथ राठोड, कंधारेवाडीचे सरपंच शंकरर डिघोळे, बाचोटीचे माजी सरपंच संभाजी हसनवाड, माळाकोळीचे उपसरपंच अरूण सोनटक्के, लोहा भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस कृष्णा केंद्रे, मंगरुळचे सरपंच किरण हाके, वडार समाजाचे गोविंद पवार, कंधार खरेदी विक्री संघाचे सदस्य राजीव मुकनर, धावरीचे सरपंच अशोक गित्ते, अॅड. सागर डोग्रजकर, बबन जोंधळे, प्रेमानंद गायकवाड, विहान कदम आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीची चेअरमन, व्हाईसचेरमन, प्रतिष्ठित नागरिक व असंख्य ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

Previous articleदेवीचा मंडप बांधतांना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू डोलारखेड येथील दुर्देवी घटना
Next articleहिमायतनगर शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख पदी संतोष नरवाडे तर शहर संघटक पदी शंकर चलमेलवर यांची नियुक्ती …