संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी 9860426674
नवरात्री निमित्त दुर्गा देवीचा मंडप बांधतांना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथे घडली.
दरवर्षी प्रमाणे डोलारखेड येथे काल चैतन्य दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली. सायंकाळी आरती झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते देवींच्या मंडपाला सरक्षण म्हणुन फेन्सींग बांधत होते पन अचानक
संरक्षण फेन्सींगमध्ये विद्युत प्रवाह आल्याने पाच जणांना शॉक लागला. मात्र यातील शुभम गजानन देठे (२२) व गोवर्धन संतोष देठे (२१) या दोघांना जास्त प्रमाणात शॉक लागल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे त्यांना तत्काळ खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र तेथून त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करुन शुभम व गोवर्धन व दोघांना मृत घोषीत केले. या घटनेने डोलारखेड गावावर शोककळा पसरली आहे.