Home Breaking News घटस्थापनेच्या मुहूर्तावर माहूर ते सिरंजनी दिव्य ज्योती चे आयोजन…..

घटस्थापनेच्या मुहूर्तावर माहूर ते सिरंजनी दिव्य ज्योती चे आयोजन…..

अंगद सुरोशे हिमायतनगर

सिरंजनी येथील सरपंच पवन करेवाड यांच्या पुढाकाराने सिरंजनी येथील युवकांनी माहूर ते सिरंजनी पदयात्रा करत आई जगदंबेच्या दिव्य ज्योती चे आयोजन केले. हिमायतनगर तालुक्यात आपल्या कर्तुत्वाच्या बळावर व जनतेच्या विश्वासाने मार्गक्रम करत असलेले सिरंजनी येथील युवा सरपंच पवन करेवाड हे नेहमीच आपल्या नवनवीन उपक्रमाने हिमायतनगर तालुक्यात परिचित असतात आंदोलन असो किंवा गावातील विकास कामे यासाठी अहोरात परिश्रम घेऊन जनतेच्या अडीअडचणीसाठी सदैव कार्यक्षम असणारे सरपंच म्हणून त्यांची तालुक्यासह नांदेड जिल्ह्यात ओळख आहे. शासनाच्या अनेक पुरस्काराने सन्मानित असलेले ते तालुक्यातील एकमेव सरपंच आहेत नव तरुणांसह गावातील तसेच तालुक्यातील जनतेच्या मनात एक वेगळी छबी निर्माण करणारे एकमेव व्यक्तिमत्व असं त्यांचं नाव जनतेत आहे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माहुर ते सिरंजनीआई जगदंबेची दिव्य ज्योत काढत त्यांनी तरुणांना एकत्रित करून सिरंजनी गावचा हिमायतनगर तालुक्यात एक आदर्श ठेवला आहे. दिव्य ज्योत सिरंजनी गावात येताच गावातील माता भगिनी तसेच भाविक भक्तांनी या दिव्य ज्योतीच पूजन करून अतिशय आनंदाच्या वातावरणात दिव्य ज्योतीचे स्वागत केले.

Previous articleज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरीचा उल्लेखनीय विशेष पुरस्कार देण्यात आला…..
Next articleपावसाने हुलकावणी दिल्याने कपासी पिके करपली….