अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी
नांदेड -गोल्ला गोलेवार यादव समाज दरवर्षी घेण्यात येणारा मेळावा, यंदाचा समाज भुषण पुरस्काराचे मानकरी जेष्ठ समाजसेवक श्री.दगडूजी संतोष काईतवाड , यांना गोल्ला गोलेवार यादव महासंघ महाराष्ट्र कमिटी , व नांदेड जिल्हा कमिटी, बोरगडी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आमंत्रित करण्यात आले आहे.
दगडूजी काईतवाड बोलताना म्हणाले आजच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत समाजातील शाखा नष्ट झाले तर समाजाचा विकास होईल, आणि समाजाच्या वतीने घेण्यात येणारा मेळावा हा समाजाच्या अस्तित्वाचा परंपराचा असुन हा सर्वांनी मिळून ताकदीने मेळावा आवश्यक केला पाहिजे हा मेळावा म्हणजे गोल्ला गोलेवार यादव समाजाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्याचा आनंद आहे. समाज हा जागृत होणे व या देशात आपले हक्क जे आपणास मिळायला पाहिजे होते त्यापासुन राज्यकर्त्यांनी यादव समाजास वंचित ठेवुन हा समाजावर मोठा अन्याय केला आहे याची सर्वांना जाणीव करुन देण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी गोल्ला गोलेवार गोलकर गोलेलु समाजातील 12 शाखा एकत्र सहभागी होवुन ताकदीने राज्यकर्त्यांना वचक निर्माण करुन दिली पाहिजे, एकजूट व्होवून यादव समाजाच्या व्यापक हितासाठी, भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गोल्ला-गोलेवार यादव समाजातील शाखा नष्ट करणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन समाजसेवक दगडूजी काईतवाड यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना म्हणाले की आपल्या समाजासाठी अनेक वर्षे ई.स.1975 मध्ये कै.बाबाराव करेवाड यांनी प्रचंड मेहनत घेतले आहे आमदार , खासदार, मंत्री, यांच्या सातत्याने पाठपुरावा करून समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळून दिलें आहे. आम्ही त्यावेळी खूप लहान होतो.
बचतगट स्थापन केले हि समाजासाठी आनंदाची बाब आहे या मधून आपल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, समस्या सोबतच इतर सामाजिक समस्या, आर्थिक, व्यावसायिक, शेती विषयक, सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे,आज महाराष्ट्र राज्यात भुमन्नाजी आक्केमवाड यांनी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. समाज त्यांच्या पाठीशी उभे राहिला पाहिजे हिमायतनगर तालुक्यातील सर्व समाज बांधव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी भावना व्यक्त करून दगडूजी काईतवाड यांनी प्रदेश अध्यक्ष आक्केमवाड यांचेही मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र भुमन्नाजी आक्केमवाड, जेष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक पी.जी.रुद्रवार सर, कोषाध्यक्ष तुकाराम कैलवाड, ग्रामसेवक जेक्कीलवाड साहेब, प्रदेश अध्यक्ष युवक महाराष्ट्र तथा युवक जिल्हाध्यक्ष नांदेड अभिषेक बकेवाड, जिल्हा मार्गदर्शक श्री.बालाजी शैनेवाड सर, हिमायतनगर तालुका अध्यक्ष प्रतिनिधी गणेश शिल्लेवाड, तालुका उपाध्यक्ष श्याम सेठ जकलवाड, ता.सल्लागार गंगाधर बासेवाड, बोरगडी, येथील जेष्ठ नागरिक नागरिक समाज बांधव उपस्थित होते..