Home Breaking News अवैध रेती माफीयांच्या त्रासाला कंटाळुन शेतकऱ्यांचे तहसिलदार सह आमदारांना निवेदन

अवैध रेती माफीयांच्या त्रासाला कंटाळुन शेतकऱ्यांचे तहसिलदार सह आमदारांना निवेदन

…..शेत रस्त्यानी रेती ची वाहतुक झाल्या मुळे शेतकर्यांनी पुढे सोयाबीन घरी आणायचे कसे ? हा मोठा प्रश्न. .
…गावात दोन तलाठी असुन कारवाई का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674

जलंब..शेगाव तालुक्यातील जलंब या गावात स्मशानभुमी रस्ता भाग 1 मधे जाणार्या शेत रस्त्याने अवैध व्यवसायाला जसा ऊत आला आहे तसाच शेतीच्या रस्त्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अवैध रेती वाहतूकदारांमुळे शेतकऱ्यांचे शेत रस्त्याची वाट लागली आहे . याकडे मात्र महसूल विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहे
….जलंब गावालगाच्या नाल्यामधून मोठा रेतीचा उपसा सुरु आहे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ट्रॅक्टर द्वारे रात्रीच्या वेळी हा उपसा केला जातो. मात्र शेतीसाठी असलेल्या रस्त्याचा उपयोग होत असल्याने या रस्त्यावर आता चिखलच चिखल निर्माण झाला आहे.ट्रक्टर मुळे रस्त्यात खुप मोठे खड्डे पडलेले आहे बैल गाडी सुध्दा जाऊ शकत नाही आणी येणाऱ्या पाच सहा दिवसात तर शेतातून सोयाबीन घरी आणायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे समस्येबद्दल यापूर्वी तहसीलदार यांना निवेदने देण्यात आली आहे, मात्र या निवेदनांना केराची टोकरी दाखवण्यात आल्याची ओरड होत आहे.त्या मुळे परत एकदा शेतकरी तहसिलदार सह आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांना निवेदन देण्यात आले व महसूल विभागाने अवैध रेती वाहतूक बंद न केल्यास जलंब भाग 1 मधील शेतकरी आमरण उपोषण करतील असा ईशारा शेतकऱ्यांनी दिला आहे या वेळी.शेतकरी संजय अवचार चंद्रशेखर देशमुख गोपाल मोहे गजानन मोहे बंडु सोनट्टक्के महादेव तायडे शरद मोहे गणेश असंबे पंजाबराव देशमुख अनंता नरवाडे मोहन दुटे श्रीराम काळे संतोष धामणकार अशा 150 ते 200 शेतकऱ्यांचे सह्या आहेत

Previous articleवसुंधरा पायींदिंडीचे अर्धापूरमार्गे नांदेड शहरात आगमन!
Next articleस्वराज्य पक्षाचे माधवराव देवसरकर यांच्या पुढाकाराने मात्र रोग निदान शिबिर संपन्न….