Home Breaking News सकल ओबीसी समाज संघटनेतर्फे गुरूवारी हिमायतनगर येथे रस्ता रोको.

सकल ओबीसी समाज संघटनेतर्फे गुरूवारी हिमायतनगर येथे रस्ता रोको.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 25 सप्टेंबर 2024

हिमायतनगर तालुक्यातील तमाम ओबीसी समाज बांधवांच्या वतीने विनंती करण्यात येते की, ओबीसी योद्धे तथा ओबीसीचे हृदयसम्राट लक्ष्मनजी हाक्के, नवनाथ आबा वाघमारे यांचे वडीगोद्री येथे,बाबासाहेब बटूळे, अँड.मंगेश ससाने, तळेकर बंधू, शरद राठोड, संतोष विरकर, बाळासाहेब दखणे यांचे आंतरावली सराटी,व आपल्या जिल्ह्याचे भुमिपुत्र दत्तात्रेय आनंतवार,अतूल पाईकराव यांचे नांदेड येथे ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी उपोषण चालू असून या उपोषणाची शासन दखल घेत नाही, यांच्या उपोषणाच्या समर्थनात आपल्या हिमायतनगर येथे ऊद्या दिनांक 26/09/2024 रोजी सकाळी ठीक 10 वाजता महात्मा फुले सभागृह येथे उपस्थित रहावे अशी विनंती हिमायतनगर ओबीसी संघटने तर्फे तहसीलदार, पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले.

रस्ता रोको हा 10:30 मिनिटांनी आहे ‌.

त्यामुळे तालुक्यातील संबंध ओबीसी बांधवांनी वेळेवर महात्मा फुले सभागृह येथे उपस्थित राहण्यासाठी आहवान करण्यात आले.

Previous articleमुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुन त्यांचा अभिमन्यू झालेला आहे ; शिक्षक आमदार  विक्रम काळे .
Next articleवसुंधरा पायींदिंडीचे अर्धापूरमार्गे नांदेड शहरात आगमन!