नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे एक दिवशीय उदबोधन शिबीर संपन्न .
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी उदबोधन शिबीर रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाले . शिबीरासाठी प्रमुख वक्ते व अतिथी शिक्षक आमदार विक्रम काळे मराठवाडा विभाग. मा . आमदार सुधिर तांबे, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ .बी बी चव्हाण, शिक्षणाधिकारी – प्रविण पाटील, उपशिक्षणाधिकारी उदय देवरे व गणेश फुलसुंदर, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष – केरूभाऊ ढोमसे ,पे युनिट अधिक्षक नितिन पाटील, शिक्षणकार्यालय अधिक्षक सुधिर पगार, लेखाधिकारी राजेश बुवा , व्याख्याते बी बी पाटील नितीन पाटील जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस के सावंत, सचिव श्री एस बी देशमुख, उपाध्यक्ष प्रदिप सांगळे डॉ . अनिल माळी , अशोक कदम, गोरख कुलधर, बी के नागरे, भागीनाथ घोटेकर, किशोर पालखेडकर, एस ए पाटील , योगेश पाटील, डी .एस ठाकरे, जाधव आर .टी, सुनिल फरस, दीपक गायकवाड , बी एन देवरे, सौ .पदमा पाठक, बी .डी गांगुडे व पदाधिकारी उपस्थित होते .
आमदार विक्रम काळे यांनी मुख्याध्यापकांची भुमिका अतिशय कठीण आहे . शिक्षक बालक चालक अधिकारी यांच्या मधला दुवा आहे यात त्यांचे कौशल्य पणाला लागते असे सांगितले . बी बी चव्हाण साहेब यांनी मुख्याध्यापकांचे कर्तव्याची , जबाबदरीची, अस्तित्वाची, अधिकाराची व आव्हानांची जाणीव करून दिली मुख्याध्यापकांसमोर असणाऱ्या विविध समस्या, अडचणी, विविध आव्हाने, उपाययोजना इ. बाबतीत मार्गदर्शन केले . याचबरोबर दिवसभरामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा , संचमान्यता, विद्यार्थी संख्या, पवित्र पोर्टल, टप्पा अनुदान, नविन पेन्शन योजना, प्रलंबीत बीले, लेखापरिक्षण, शाळेतील विविध कामे, गुणवत्ता इ .बाबत चर्चा करण्यात आली . कार्यक्रमाचे नियोजन एस बी देशमुख यांनी केले ,प्रास्ताविक श्री एस के सावंत , सुत्रसंचलन सौ . पदमा पाठक यांनी केले व आभार श्री प्रदिप सांगळे सर यांनी मानले जिल्ह्यांतून १ooo पेक्षा जास्त मुख्याध्यापक हजर होते असे उद्बोधन शिबीर दोन दिवसांचे व्हावे अशी मागणी अनेक मुख्याध्यापकांनी केली