ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे
जलंब…स्टोन क्रशर ला परवाना देऊ नये या साठी आज, शेतकऱ्यांनी तहसिलदार तथा जलंब ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले.
…जलंब भाग 2 ग.क्र 759 (बरड) हे मालक रा. टाकळी ता जळगाव जामोद यांचे मालकीचे शेत असुन त्यांना तेथे स्टोन क्रशर उद्योग चालु करणेसाठी परवाना जलंब ग्रामपंचायत सह संबधीत कार्यालया कडे केला आहे. परंतु ग.क्र 759 च्या आजुबाजुला असलेल्या शेतकऱ्यांनी. जिथे स्टोनक्रेशर उद्योग चालु आहेत अशा शेतकऱ्यांचे शेतीची तसेच घरांची पिण्याच्या पाण्याची झालेली अवस्था पाहुन हा उद्योग आपल्या येथे होऊ नये करीता जलंब ग्रामपंचायत सरपंच दुर्गाताई गव्हांदे उपसरपंच महेश गव्हांदे ग्रामसेवक काळे साहेब व तहशिलदार यांनी स्टोन क्रेशर ला परवाना देऊ नये असे निवेदन देण्यात आले. या वेळी शेतकरी चंद्रशेखर देशमुख उत्तम घोपे दिलीप शेजोळे शामसुंदर चोपडे विठ्ठल सोनट्टक्के विनोद मोहे देवानंद गव्हांदे विनोद मोरे सौ मालुताई देशमुख दिपक चोपडे गणेश लागे गणेश आकोटकर अनिल कंठाळे आदी शेतकरी हजर होते