Home Breaking News पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांनी टाकल्या माना!

पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांनी टाकल्या माना!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 23 सप्टेंबर 2024

हवामानाचा अंदाजानुसार म्हणावा तसा पाऊस या आठवड्यात हिमायतनगर तालुक्यात पडला नाही. हिमायतनगर तालुक्यात सध्या कुठं पाऊस तर कुठं कडक उन्ह असल्याने खरीप हंगामातील कापुस, सोयाबीन, हळद या पिकांनी पाण्याअभावी माना खाली टाकल्या आहेत. आधी अतिवृष्टीमुळे पावसाने अतोनात नुकसान झाले. आणि आता परतीच्या पाऊसच पडत नाही. कडक उन्हाने तापलेल्या जमिनीवर प्रचंड भेगा पडल्या आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे हलक्या जमिनीतील पिके सुकत असल्याचे वास्तव चित्र सध्या हिमायतनगर तालुक्यात आहे. ज्यांच्याकडे विहीर, बोअरच्या पाण्याची उपलब्धता आहे. तिथे मात्र लाईट साथ देत नाही. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने दिवसा लाईट देऊन शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने बळीराजाला दिलासा द्यावा. अशी शेतकऱ्यांची मागणी केली आहे.

Previous articleअवैध रेती माफीयांनी लावली शेतकऱ्यांचा शेत रस्ता ची वाट 
Next articleशेगाव पंचायत समितीतील जलंब ग्रामपंचायत येथे आज स्वच्छता ही सेवा अभियान….