चिखल रस्त्यातून मार्ग कसा काढावा… महसूल विभाग कारवाई का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे
शेगाव तालुक्यातील जलंब या गावात अवैध व्यवसायाला जसा ऊत आला आहे तसाच शेतीच्या रस्त्याचाही मोठा प्रश्न अवैध वाहतूकदारांमुळे निर्माण झाला आहे. याकडे मात्र पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी आता कुणाकडे पहावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
जलंब गावालगाच्या नाल्यामधून मोठा रेतीचा उपसा सुरु आहे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ट्रॅक्टर द्वारे रात्रीच्या वेळी हा उपसा केला जातो. मात्र शेतीसाठी असलेल्या रस्त्याचा उपयोग होत असल्याने या रस्त्यावर आता चिखलच चिखल निर्माण झाला आहे.ट्रकर मुळे रस्त्यात खुप मोठे खड्डे पडलेले आहे बैल गाडी सुधा जाऊ शकत याच गड्ड्यांन मुळे कही दिवसा पुर्वी पाण्यात गढ्याचा अदांज न आल्या मुळे शेतकर्याचे बैल गाडी पल्टी झाली व जीवित हाणी होतानां टळली अशातच 10/15 दिवसानंतर शेतातुन सोयाबीनचे घरी आणायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे समस्येबद्दल यापूर्वी तहसीलदार यांना निवेदन ही देण्यात आले होते