Home Breaking News श्रध्येय बाळासाहेब. आंबेडकर यांच्यादिशा-निर्देशात खामगांव येथे भव्य जन-आक्रोश मोर्चा संपन्न.

श्रध्येय बाळासाहेब. आंबेडकर यांच्यादिशा-निर्देशात खामगांव येथे भव्य जन-आक्रोश मोर्चा संपन्न.

सहसंपादक जिवन भोजने

अभूतपूर्व मोर्चा,वृद्ध तरुण,बालक-बालिका-महिला यांना आपल्या एका आवाहनावर एकत्र करून मोर्चा यशस्वी,

तरुणांमध्ये देवाभाई स्टाईलची क्रेझ वाढताना दिसत आहे

कोणत्याही राजकीय पक्षाला जे जमलं नाही ते लोकशाही मार्गाने देवाभाऊंनी करून दाखवलं.

सामाजिक शक्तीप्रदर्शनात युवक आघाडीवर

अकोल्यानंतर बुलढाणा हा वंचित बहुजन आघाडीचा गड होऊ शकतो असे अनेक राजकीय पंडितांनी भाकीत वर्तवली आहेत.विशेषतः खामगाव मतदार संघात ग्रामीण व शहरी भागातील जुन्या भारिप व ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर निष्टा असणाऱ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे.अनेकांनी हा खामगाव हा गड जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला,पण गर्दी जमते पण ती मतात परावर्तित होतांना दिसत नाही हे आजतागायत दिसून आले.पण सामाजिक क्षेत्रातुन राजकिय रणांगणात उतरलेले देवाभाई हिवराळे याला अपवाद ठरू शकतात. अशी चर्चा जनमानसात दिसून येते आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील बौद्धचं नव्हे तर इतर मागास प्रवर्गातील घटक,आणी बहुजन,देवाभाऊ यांनी आपल्या कौशल्याने जुळवून घेतला आहे.उत्तर बुलढाण्याला असा दमदार जिल्हाध्यक्ष मिळाल्याने शिव-शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीत राबणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य दिसत आहे.निवडणूकांच्या रणांगणात पक्षाला सतत अपयश येत आहे.परंतु खचून न जाता डगमगून न जाता, पक्षप्रमुख यांच्या दिशा-निर्देशानुसार पक्षातील नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी वंचित शोषित बहुजन समाजाचा विचार व पक्षाची ध्येय-धोरणे समाजात रुजविण्यासाठी कटीबद्ध आहेत.देवाभाई हिवराळे राजकीय क्षेत्रात नवखे नाहीत,त्यांना ग्रामीण स्तरावरील लोकांचा कल लवकर कळतो,चितोडा ग्रामपंचायतीच्या निवडणूकित त्यांनी धमाल केलेली आहे.भाषण कलेमध्ये तरबेज नसले तरी संवाद त्यांचा प्रत्येकाशी टिकून आहे.

त्यांच्यासोबत खामगाव व परिसरातील अभ्यासू वकील मंडळी,व इतर पक्षातील जिज्ञासू पदाधिकारी यांची वज्रमुठ आहे.समाजातील सुशिक्षित कर्मचारी वर्ग पाठीशी आहे. अनुभव व स्वानुभवातून एक दिवस देवाभाई भाषणाच्या बळावर देखील मैदान गाजवतील यात शंकाच नाही.आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड जनआक्रोश मोर्चा देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.ही त्यांच्या नेतृत्वाची व विजयाची नांदी आहे.

Previous articleजिल्हाधिकारी नासिक यांना निवेदन