Home Breaking News कल्याणरावजी आखाडे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी –

कल्याणरावजी आखाडे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी –

सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 11 सप्टेंबर 2024

सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची संधी द्यावी अशी मागणी सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केली आहे.

राज्यात विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी महायुती सरकार मध्ये जोरदार हालचाली सुरू असून यासाठी कल्याणराव आखाडे यांचा विचार करण्यात यावा. यामध्ये कल्याणराव आखाडे यांना संधी द्यावी ही राज्यातील सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह, ओबीसींतील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

गेली पंचवीस वर्षे समाजकार्यात स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून समाज जागृतीसाठी झोकुन देऊन काम करणारे निष्ठावान नेतृत्व आहे . कल्याणराव आखाडे राज्यातील माळी समाजाचे समाजमान्य नेतृत्व आहे. सावता परिषद माळी समाजाचे सक्रीय संघटन असुन राज्यातील सत्तावीस जिल्ह्यांमध्ये सक्रीयपणे कार्यरत आहे.माळी समाजाच्या हिता- अस्मितासाठी लढणारा हे लढवय्ये व्यक्तिमत्त्व आहे.श्रीक्षेञ अरण विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीचे त्यांचे योगदान आहे.राज्यातील मतदार संघात सावता परिषदेची निर्णायक व्होट बँक आहे.अनेक वर्षांपासून माळी समाजाला विधानपरिषदेवर संधी मिळालेली नाही.कल्याणराव आखाडे यांना संधी दिल्यास निश्चित आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होऊ शकतो.अनेक वर्षापासुन निष्ठेने, तळमळीने व प्रमाणिकपणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचलेले संघटक म्हणून सावता परिषदेचा उल्लेख आहे. कल्याणराव आखाडे राज्यातील तरूण ओबीसी चेहरा म्हणून वंचित, उपेक्षितांच्या न्यायासाठी झगडणारे आहेत.समाजाच्या न्यायिक भावनेचा विचार करावा. अजितदादा पवार यांनी विधानपरिषदेवर त्यांना संधी द्यावी अशी मागणी प्रसिद्धी पञकाद्वारे सावता परिषदेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केली आहे.

Previous articleजनसामान्या साठी अहोरात्र झगडणारा लोकनेता .. बाबुरावजी कदम कोहळीकर
Next articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या सन्मान सोहळ्याचा हिमायतनगर तालुक्यातील बहिनींणी लाभ घ्यावा. बाबुराव कदम कोहळीकर