Home Breaking News महायुती सरकारच्या निर्णयाचे नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत.

महायुती सरकारच्या निर्णयाचे नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 08 सप्टेंबर 2024

श्रीसंत सावता महारांजाच अरण तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील माळी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा वेळोवेळी शासन दरबारात मांडून त्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवत, त्याचा पाठपुरावा करत घराघरात कल्याण काका आखाडे घेऊन गेले, अरणच्या विकासासाठी तसेच अरण तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा मिळावा म्हणून सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.कल्याण आखाडे यांनी माळी समाजाचे मोठ मोठे मेळावे घेतले. दोन वेळेस स्व.गोपीनाथराव मूंडे, दोन वेळेस पंकजाताई मूंडे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
अश्या मान्यवरांच्या उपस्थितीत माळी समाजाचे हजारोंच्या संख्येने मेळावे घेऊन अरणच्या विकास व अरण तीर्थक्षेत्रास ‘अ’ दर्जा मिळावा, म्हणुन सातत्यपूर्ण पाठपूरावा कल्याण आखाडे यांनी केला. महायुतीच्या सरकारने हा निर्णय घेतल्या बद्दल त्यांचे सावता परिषद नांदेडच्या मध्यवर्ती कार्यालय गोकुळनगर येथे फटाक्यांची आतषबाजी करत जलोशात स्वागत करण्यात आले. यावेळी सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रभारी गोरखनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर गोरे, जिल्हा प्रवक्ते मारोती शितळे,महानगराध्यक्ष बालाजी बनसोडे, युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत राऊत, युवा महानगरध्यक्ष संदीप झांबरे, विठ्ठल राऊत, महानगर सरचिटणीस कैलास शिंदे, आदि सह समाज बांधव उपस्थित होते.

Previous articleअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या.
Next articleमहानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्रभर राज्यव्यापी आमरण उपोषण तूर्तास स्थगिती देवुन कामगारांचे काम मात्र बंद राहिल