मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 08 सप्टेंबर 2024
हिमायतनगर तालुक्यातील मौजे शेलोडा गाव हे हळद उत्पादनासाठी ओळखल्या जाते.
त्यामध्ये शेलोडा येथील प्रगतिशील शेतकरी गजानन भोयर यांनी आजरोजी अडीच एकर क्षेत्रामध्ये हळद या पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्यांनी एक एकर शेतात त्यांना दरवर्षी प्रती एकर 40 क्विंटल च्या जवळपास उत्पादन काढुन विक्रम नोंदविला आहे. पण दुर्दैवाने त्यांची दखल कृषि विभाग, पंचायत समिती कृषि विभाग यांनी घेतली नाही. हि शोकांतिका आहे. शेलोडा या गावात त्यांनी हळदीचे विक्रमी उत्पादन घेऊन ईतर शेतकरी बांधवांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. ते गावातील इतर सर्व शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन नेहमीच मार्गदर्शन करतात. असे ही गावातील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
हळद या नगदी पिकाला सद्यातरी चागंला भाव मिळत आहे. म्हणुन शेतकरी समाधानी आहे. शेतात अपार कष्ट काबाडकष्ट करून, हळद पिकांचे उत्पादन घेतले जाते. हळद या पिकांचे उत्पादन घेतांना खर्चही खूप जास्त येतो आहे. असेही जाणकार शेतकरी सांगत आहेत.