Home Breaking News पत्रकार विजय वाठोरे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” जाहीर ….. 

पत्रकार विजय वाठोरे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” जाहीर ….. 

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

नांदेड – युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” हा पत्रकार विजय नारायण वाठोरे यांना जाहीर झाला आहे. त्यांना विद्यार्थी सहाय्यक समिती हॉल शिवाजीनगर,फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे येथे स्मृतिचिन्ह, मानपात्र, सन्मानपत्र, मेडल मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु ) येथील विजय नारायण वाठोरे हे उच्च विद्याविभुषित असून त्यांनी गेल्या २०१४ पासून साहित्यिक व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पत्रकार विजय वाठोरे हे पत्रकारिता,शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांचे ‘ ठसका ‘ हे वात्रटीका सदर दै वीर शिरोमणी,दै प्रबुद्ध परिवार व दै क्रांतिशस्त्र मध्ये प्रकाशित होत आहे.यातून ते सरकार, नेते, भ्रष्टाचार, राजकारणाची पोलखोल यावर आपल्या लेखणीतुन चांगलाच आसूड उगारतात.लेख, कविता,बातम्या यातून ते समाजाचे प्रतिनिधित्व करून न्याय मिळवून देण्याचे,समाजात जनजागृती करणे, वास्तविकता मांडणे,सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे , समाजप्रबोधनाचे काम त्यांनी पत्रकारितेतून केलेले आहे.ते युवा ग्रामीण पत्रकार संघ हिमायतनगर चे तालुकाअध्यक्ष आहेत.कमी कालावधीत त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला शिक्का उमटवला आहे.महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज पोर्टल व चॅनेल चे ते संपादक आहेत.युवा महाराष्ट्र फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे यांनी विजय वाठोरे यांना पुरस्कार निवडपत्र दिले आहे.

यापूर्वी ही त्यांना साहित्य क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल साहित्य काव्यगंध पुरस्कार २०१७, घे भरारी साहित्य संमेलनात युवा सन्मान पुरस्कार २०१८,कवी विचार मंच शेगाव च्या तिसऱ्या साहित्य संमेलनात उत्कृष्ट ग्राफिक्सकार २०१९, महात्मा फुले समता परिषद तर्फे महाराष्ट्र भूषण व समता गौरव पुरस्कार २०२४ इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत.त्यांनी अनेक साहित्य संमेलनात सहभाग घेऊन साहित्य संमेलने गाजवली आहेत.पत्रकारिता, साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या निस्वार्थी अन उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार गंगाधर वाघमारे,परमेश्वर गोपतवाड,गंगाधर गायकवाड, नागोराव शिंदे,दाऊ गाडगेवाड,नागेश शिंदे,अंगद सुरोशे,चंद्रकांत कदम,रोहिणी पांडे,मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी,अल्ताफ शेख, विष्णू जाधव,संभाजी वाठोरे से. नि.मुख्याध्यापक,नारायण वाठोरे,बेबीनंदा सोनवणे, चंद्रमणी वाठोरे,राजरतन वाठोरे,डॉ. संदेश नांदेडकर ,सुमेध वाठोरे,संघप्रिया कवडे,इंजि. शुभांगी नगराळे,लंकेश वाठोरे, इंजि.अमोल राऊत यांच्यासह आदिजणांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleनिकष न बघता सरसगट आर्थिक मदत करावी.
Next articleप्रगतशील शेतकरी गजानन भोयर हे हळद पिकांचे घेतात विक्रमी उत्पादन.