Home Breaking News निकष न बघता सरसगट आर्थिक मदत करावी.

निकष न बघता सरसगट आर्थिक मदत करावी.

👉 शेतकऱ्यांची मागणी.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 ऑगस्ट 2024

संबंध नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील वरील तिस इंचाचा जमिनीवरचा सुपीक थर पाण्याने वाहुन गेल्यामुळे जमिनी नापीक होऊन पडीत पडण्याची भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. एक वर्षाचे नाही तर अनेक वर्षांचे पिक जमिनीत उगवणार नाही. हि काळजी शेतकऱ्यांना पडली आहे.

उसणे-पासणे, कर्ज काढून शेतकऱ्यांने काळया आईची ओटी बियाणे पेरणी करुन केली. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. होत नव्हतं सार काही पावसामुळे वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत. उद्भवलेल्या परीस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने त्वरित द्यावी. आणि बेचिराख झालेली जमिनीवरील पिकांचे कुठलेही निकष व अटी न लावता त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Previous articleहदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी पुत्र शेतकर्यांच्या मदतीला धाऊन आला …..
Next articleपत्रकार विजय वाठोरे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” जाहीर …..