मी सदैव माझ्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच आहे…मा_बाबुरावजी कदम कोहळीकर
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
श्री बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगांव तालुक्यातील गावांची भेट घेऊन पूर परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान दगावलेल्या जणावरांचे तसेच घरांचे झालेले नुकसान यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना दिल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे जनावरांचे घरांचे एवढे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले की ते कशानेच भरून निघणे शक्य नाही.काही गावातील नागरिकांच्या घराची पडझड होऊन त्यांच्या संसार उपयोगी वस्तुची व घरातील अन्यधान्याची पूर्ण नासधूस झाल्यामुळे काही कुटुंबांना आज चूल पेटवने सुद्धा शक्य नाही. अश्या गरजु कुटुंबांना धान्य व पैसे देऊन बाबुराव कदम कोहळीकर यांनी त्या कुटुंबांना मदतीचा हात दिला. व मि सदैव तुमच्या सुख दुखात तुमच्या सोबत आहे आसा धिर त्या पुरग्रस्त कुटुंबांना देऊन शेतीचे घरांचे गावाचे शाळेचे झालेल्या नुकसानबद्दल शासकीय मदत मिळवण्याकरिता सर्वतोपारी प्रयत्न करू असे अश्वासन यावेळी बाबुरावजी कदम कोहळीकर साहेबांनी दिले.