Home Breaking News हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा – आमदार जवळगावकर यांचे...

हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा – आमदार जवळगावकर यांचे राष्ट्रपती यांना निवेदन

अंगद सुरोशे

हिमायतनगर (हिमायतनगर ) – हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि ४ सप्टेंबर रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु ह्या नांदेड जिल्ह्यातील उदगीर येथे आल्या असता हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी मुळे पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या संदर्भात आज भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीषजी महाजन यांना नांदेड विमानतळ येथे निवेदन दिले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर चे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांची भेट घेत आपल्या मतदारसंघातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानी साठी तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी निवेदन दिले.हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर गंभीर संकट आले असून १ सप्टेंबर २०२४ पासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत.परिणामी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. या अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी निराश झाला आहे. त्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम झाला आहे. परिस्थिती भीषण आहे आणि बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचे झालेले नुकसान कमी करण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.

या पार्श्वभूमीवर हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना या आपत्तीतून सावरण्यासाठी सरकारने तातडीने सर्व साधारण आर्थिक मदत द्यावी. अशी माझी कळकळीची विनंती आहे.आपण या प्रकरणाकडे त्वरित लक्ष दिल्यास त्या शेतकऱ्यांचे दुःख मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि त्यांचे जीवन पुन्हा उभारण्यास मदत होईल अश्या आशयाचे निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व नांदेडचे पालकमंत्री श्री गिरीषजी महाजन यांना हिमायतनगर चे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी दिले आहे.

Previous articleजलंब येथे बैल पोळा उत्साहात साजरा
Next articleकामारवाडीच्या सरपंचपदी सारीका श्याम हुलकाने कायम