Home Breaking News जलंब येथे बैल पोळा उत्साहात साजरा

जलंब येथे बैल पोळा उत्साहात साजरा

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674

जलंब येथे दर्श अमावस्या च्या दीवशी घरोघरी बैलपोळा साजरा करण्यात आला गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी केला पोळा सण साजरा, आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या वेशीवर

आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. ‘ त्यानंतर,दर वर्षी प्रमाने ‘मानवाईक’ (मानाचा बैल काढण्यात येतो या वर्षी चद्रशेखर गायगोळ यांचा यांचा मानाचा बैल काढण्यात आला त्याला तोरणा खाली आणुन पुज्या करून मारुतीच्या देवळात नेतात व या नंतर सुंदर सजवलेली बैल जोळी काढण्यात येतो ती गावातील सरपंच पती सुरेश गव्हादे व जलंब पो.स्टे ठानेदार अमोल सांगळे व गावकरी मंडळी यांच्या कडुन काढतात नंतर पोळा फुटतो.

व सर्व‌ बैल तोरना खालुन घरी नेऊन त्यांना ओवाळतात. शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला गेल्याने तो उत्साहाने साजरा करण्यात येतो. म्हणून आज रोजी पोळा सण साजरा, करण्यात मोठ्या संखेने गावकरी मंडळी पोळ्यात उपस्थित असतात कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणुन जलंब पोलीस स्टेशन चे ठानेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तैनात होते,

Previous articleबैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला खांदे मळण निमित्त बारा बलुतेदारांचा सन्मान सोहळा संपन्न.
Next articleहदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा – आमदार जवळगावकर यांचे राष्ट्रपती यांना निवेदन