Home Breaking News गोल्ला -गोलेवार यादव महासंघ हिमायतनगर तालुका कार्यकारणी समाजकार्यात महाराष्ट्रात अग्रेसर – प्रदेशाध्यक्ष...

गोल्ला -गोलेवार यादव महासंघ हिमायतनगर तालुका कार्यकारणी समाजकार्यात महाराष्ट्रात अग्रेसर – प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आकमवाड

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 01 सप्टेंबर 2024

बाबाराव जरगेवाड, अभिषेक बकेवाड यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या कडून सत्कार…

हिमायतनगर – गोल्ला-गोलेवार यादव महासंघ ता. हिमायतनगर च्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा भुमन्ना अक्केमवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिमायतनगर शहरांमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष स्थानी प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब बोलतांना म्हणाले की गोल्ला गोलेवार समाजातील युवकांनी अनेक क्षेत्रांत उतरावे आम्ही त्यांना वेळोवेळी लागेल तशी मदत करू आसा विश्वास त्यांनी दिला आहे.

ओबीसी आरक्षण चळवळीत हिमायतनगर तालुक्यात बाबाराव जरगेवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल,व अत्यंत कमी वयात व आपल्या परीस्थितीचा सामना करत हिमायतनगर येथील यूवा तरुण अभिषेक बकेवाड यांनी हिमायतनगर तालुक्यात गोल्ला गोलेवार समाज संघटणेच अतिशय उत्कृष्ट संघटण तयार केल्या बद्दल, महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय यादव महासभा दिल्ली स्थान निर्माण केले त्यांचाही सत्कार गोल्ला गोलेवार समाज प्रदेश अध्यक्ष भुमना आकेमवाड यांनी केला आहे.

तसेच प्रदेश अध्यक्ष बोलतांना म्हणाले की आजच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत समाजाला एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, व आपल्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक, शेती विषयीक समस्या सोबतच ईतर सामजिक समस्या सोडवण्यासाठी आपला समन्वय अबाधित राहणे खूप गरजेचा आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

दर वर्षी घेण्यात येणारे सामजिक उपक्रम व गुरूवर्य राष्ट्रसंत श्री साईनाथ महाराज यांचे संकलपनेतील बचत गटाविषयी सविस्तर माहिती हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड यांनी दिली.

गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे प्रमुख मार्गदर्शन प्राध्यापक मा.पी.जी, रुद्रवाड सर म्हणाले की येणाऱ्या काळात मुला मुलींना खेळाच्या व गप्पागोष्टी च्या माध्यमातून मुला मुलींमध्ये समानता कशी आणता येईल समजावून सांगितले व पालकांना या संदर्भात जाणिकपूर्व लक्ष देऊन यापुढे बालविवाह थांबवावे. मुलींना समाजात वावरताना कुठल्या कुठल्या समस्यांना तोंड देण्यासाठी पालकांनी पूरक लक्ष देऊन मुलीचे प्रत्येक क्षेत्रात पुढे करून समाजात व देश पातळीवर सेवा करण्याचे योगदान देता येईल अशा प्रकारच्या मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी गोल्ला गोलेवार समाज संघटना प्रदेश अध्यक्ष भुमना आकेमवाड, पिंटू गूरजी रूद्रवाड, तूकाराम कैलवाड, अशोक कासराळीकर, अर्धापूर ता.अध्यक्ष गंगाधर बकेवाड, सुभाषराव शिल्लेवाड हिमायतनगर गोल्ला गोलेवार समाज महासंघ ता. अध्यक्ष,श्याम जकलवाड ता. उपाध्यक्ष, राजु चिकनेपवाड,नारायन कोरेवाड ता. कार्याध्यक्ष, प्रकाश भदेवाड ता‌.संघटक,

कोषाध्यक्ष दत्तात्रेय चितलवाड, सह कोषाध्यक्ष गंगाधर बासेवाड सह कोषाध्यक्ष ,सुरज चितलवाड ता. प्रसिध्दी प्रमुख, साई कपलवाड ता. युवा अध्यक्ष, कृष्णा आंबेपवाड युवा कार्याध्यक्ष, संजयजी काईतवाड शिवसेना ता‌ संघटक, शंकर भैरेवाड, साईनाथ आनमवाड, गणेश घोसलवाड, साईनाथ निम्मेवाड,मधूकर मूरगूलवाड, विश्वनाथ शिल्लेवाड,एकनाथ काईतवाड साई बकेवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleतिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन विशेषांकाच्या सहसंपादक पदी डॉ.अशोक शिरसाट यांची निवड : ….
Next articleबैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला खांदे मळण निमित्त बारा बलुतेदारांचा सन्मान सोहळा संपन्न.