Home Breaking News हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात भव्य पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न

हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात भव्य पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

— के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दत्त चौक, सिडको, नाशिक येथे आज शनिवार दि. 31.8.2024 रोजी इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व पालकांची व शिक्षकांची सहविचार सभा खेळीमळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी मंचावर सभेचे अध्यक्ष संस्थेचे जेष्ठ विश्वस्त  लक्ष्मण नाना जायभावे, विद्यालयाचे प्राचार्य  प्रदीप सांगळे सर पर्यवेक्षक  विलास बोडके सर,मोहन चकोर शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात केली. सभेचे प्रास्ताविक  चंद्रप्रकाश यादव सर यांनी केले तर विद्यालयात वर्षभर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती श्री नंदलाल प्रजापती सर यांनी दिली. विद्यालयाचे प्राचार्य प्रदिप सांगळे सर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात पालकांना विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती व विद्यार्थी सुरक्षा व परिवहन व्यवस्था याबाबत माहिती व सूचना देऊन शिक्षक पालक आणि छात्र या संदर्भात काय करण्याची गरज आहेत या संदर्भात पालकांशी चर्चा केली .शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष  लक्ष्मण नाना जायभावे यांनीही पालकांशी संवाद साधला व पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या संस्था पातळीवर व व्यक्तिशः वेळोवेळी सोडविण्याचा प्रयत्न करू असा विश्वास पालकांना दिला.आभार प्रदर्शन  एस के काळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख श्री के पी कापडी सर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Previous articleविजेचा तार लागल्याने बैलाचा जागीच मृत्य…… 
Next articleतिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन विशेषांकाच्या सहसंपादक पदी डॉ.अशोक शिरसाट यांची निवड : ….