Home Breaking News कार्यालयीन सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. बी. बोरा सेवानिवृत्त.

कार्यालयीन सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. बी. बोरा सेवानिवृत्त.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक – 31 ऑगस्ट 2024

नांदेड जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय नांदेड येथील कार्यालयातील एक उत्कृष्ट आणि उत्तम प्रशासक म्हणून एस. बी. बोरा साहेब हे वयाच्या 58 व्या वर्षी शासकीय वयोमानानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी नियमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आपली शासकीय सेवा पार पाडीत असतांना अनेक चांगली कामे केली आहेत. कार्यालयातील सर्वच अधिकारी, कर्मचारी यांच्या सोबत मिळुन – मिसळून राहुन आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटविला आहे. सदैव हसतमुखाने प्रसन्न राहुन, प्रचंड शासकीय कामाचा अनुभव असल्याने बोरासर यांनी आपल्या कार्यालयीन कर्मचारी यांना नेहमीच सहकार्य केले आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीसाठी नांदेड जिल्हा कृषि अधिकारी कार्यालयातील लीपीक संवर्ग संघटनेचे मा. सचिव दिलीपराव अनगुलवार, कृषि सहाय्यक पालेपवाड , अनमोड आदी कर्मचाऱ्यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleअतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान.
Next articleविजेचा तार लागल्याने बैलाचा जागीच मृत्य……