हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर – 8983319070
केंद्रीय मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंग आर्या हे मंगळवार पासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
दुपारी 12 ते 2 या कालावधीत पेठ रोड वरील एकलव्य रेसिडेंन्शियल पब्लिक स्कूलमध्ये युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समिति सदस्य व अधिकारी यांच्या सोबत आर्या हे संवाद साधणार आहे. बुधवार दिनांक 28 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आर्या हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान संवाद कार्यक्रमाला संबंधित प्रतिनिधि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुणकुमार जाधव यांनी केले.