Home Breaking News नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन.

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 26 ऑगस्ट 2024

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब हे गेले अनेक दिवसांपासून असाध्य व दिर्घ आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते. पण आज अखेर हि झुंज अपयशी ठरली, व सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. आपल्या जीवनातील अनेक दुःखाचे डोंगर सहजपणे पेलवत , जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे , प्रत्येकाच्या सुख दुःखात अग्रेसर पणे सहभागी होऊन कार्य पूर्णत्वास नेणारे , जिल्ह्यातील एक सर्वसमावेशक नेतृत्व नांदेड जिल्हयानी आज गमावले आहे. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात हि फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हि झीज आमच्यासाठी क्राँग्रेस पक्षासाठी कधीही न भरून येणारी आहे . शेवटी आज आम्ही सगळ्यात मोठा आधार गमावला !!

Previous articleपार्श्वनाथ महादेवाच्या मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.
Next articleराष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग आज दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर