Home Breaking News पार्श्वनाथ महादेवाच्या मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

पार्श्वनाथ महादेवाच्या मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 26 ऑगस्ट 2024

श्रावण महिन्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी महादेव मंदिरात शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. व तसेच श्रावणा महिन्यातील प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सवना ज. महादेव फाटा येथे पार्श्वनाथ महादेव मंदिर सवना येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. रविवारी सकाळी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परीसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला आहे.

श्रावण महिन्यात श्री परमेश्वर मंदिर हिमायतनगर येथे एक महिन्यापासून शिवमहाकथा पुराण आयोजित करण्यात आले आहे. विविध मंदिरात कथा, किर्तन, भजन, प्रवचन आदी कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण हे भक्तीमय झाल्याचे दिसून येत आहे.

Previous articleश्री कनकेश्वर वरदविनायक गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.
Next articleनांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन.