Home Breaking News श्री कनकेश्वर वरदविनायक गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.

श्री कनकेश्वर वरदविनायक गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 24 ऑगस्ट 2024

हिमायतनगर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या

श्री कनकेश्वर वरदविनायक गणपती मंदिर (तळ्यावरचा गणपती) संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. एका भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उपवासाचा फराळ वाटप करण्यात आले.
मंदिर कमेटिने मंदिराचा परीसर स्वच्छ ठेवुन, फुलांची झाडांची लागवड करुन सुशोभीकरण केले आहे. बाजुला पाण्याचा तलाव असल्याने मंदिर परिसर भाविकांना अगदी मनमोहक आणि आकर्षक दिसत आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरातील व तालुक्यातील सर्व भावीकभक्तांची संख्या दर्शनासाठी वाढत आहे. शहरातील काही दानशुर मंडळीनी प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भाविकांना फराळाचे वाटप करण्याचे दर्शनी फलकांवर नियोजन केले आहे. दि.23.०8.2024 रोजी महाप्रसादाचे आयोजन प्रविण प्रकाश कोमावार व राम माने पाटील यांनी केले होते. सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा दुपारी 2 ते 6 या वेळेत भाविकांनी श्रींच्या प्रसादांचा लाभ घेतला आहे.

Previous articleमुरझळा येथे शाळकरी मुलांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या…..
Next articleपार्श्वनाथ महादेवाच्या मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.