Home Breaking News आदिलाबाद – नांदेड कृष्णा एक्स्प्रेसला कमी डब्बे असल्याने प्रवाशांची हेळसांड!

आदिलाबाद – नांदेड कृष्णा एक्स्प्रेसला कमी डब्बे असल्याने प्रवाशांची हेळसांड!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 ऑगस्ट 2024

आदिलाबाद वरुन नांदेडला जाणारी कृष्णा एक्स्प्रेस रेल्वेगाडी ला सहा ते आठच डब्बे असल्याने ग्रामीण, शहरी भागातील प्रवाशांना प्रसंड आणि नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशन नव्याने बनविण्यासाठी थाटामाटात भुमीपुजन केले. परंतु रेलवेगाडीला कमी डब्बे देऊन प्रवाशांना त्रास देण्याचा हेतू आहे का? असे नांदेड वरुन तब्बल दोन तास उभे राहुन हिमायतनगर येथील रेल्वेस्टेशनला उतरल्यावर एका प्रवाशाने बोलुन दाखवले.
अगोदर सतरा डब्बे गाडीला सोडत असत, त्यामुळे प्रवाशांना मोकळी जागा बसायला मिळायची परंतु कमी डब्बे देऊन प्रवाशांना होणारा त्रास थांबवावा. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

Previous articleपुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.
Next articleमुरझळा येथे शाळकरी मुलांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या…..