Home Breaking News पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.

पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 18 ऑगस्ट 2024

भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पाळज येथे कै. किशनराव बच्चेवाड यांच्या बाराव्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना क्रिडा गणवेशाचे वाटप करण्यात आले. व तसेच इयत्ता तिसरी व दहावीतील विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सहशिक्षक शंकरराव बच्चेवाड यांनी आपल्या वडिलांच्या बारावे पुण्यस्मरणाचे औचित्य साधून केले आहे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक पत्तेवारसर आणि प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सुभाषराव चटलावार, शालेय शिक्षण व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष अवधुतराव भुपती, गणपतराव जाधव पं.स. स. प्र., ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणराव डोंगरे पुजेकर अडेलु उपाध्यक्ष व सर्व शिक्षक वृंद या कार्यक्रमासाठी उपस्थीत होते. आपणाला गणवेश, पेन आदी शालेय साहित्य मिळाल्या नंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहुन उपस्थित मान्यवर आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी एकुण 225 विद्यार्थ्यांना पेनीचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीडवाडसर, कावळे सर यांनी केले. तर शेवटी शंकरराव बच्चेवाड यांनी आभार मानले.

Previous articleवाडेगावात गोवंशाना मिळाले जीवदान !स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!
Next articleआदिलाबाद – नांदेड कृष्णा एक्स्प्रेसला कमी डब्बे असल्याने प्रवाशांची हेळसांड!