Home Breaking News वाडेगावात गोवंशाना मिळाले जीवदान !स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

वाडेगावात गोवंशाना मिळाले जीवदान !स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854

वाडेगाव -बाळापूर पातूर तालुका ग्रामीण परिसरात तसेच गावात अनेक गोवंश चोरीला गेलेली आहेत. पोलिसात तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत पण कोणतीच कारवाई झाली नाही. गावात एक टोळी आहे ही टोळी रात्री बेरात्री वाहनात मोकाट गुरे तसेच घर अंगणात गोठ्यात असलेले गुरे तसेच शेतातील गोठ्यातील गुरांची मोठया शिताफिने चोरी करून कोंबून घेऊन जातात. काल झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत पोलिसांनी योग्य तपास केला तर ही टोळी पकडली जाऊ शकते असे जनतेत बोलल्या जात आहे.स्थानिक गुन्हे शाखेने दि. 18 ऑगस्ट रोजी गुप्त माहितीद्वारे छापा टाकून एकूण 16 गोवंश यामध्ये 12 गाई आणि 4गोऱ्हे कत्तली साठी एका 10 बाय 10 च्या खोलीत कोंबून ठेवून त्यांना चारा पाणी न घालता उपाशी ठेवले. त्यावरून त्यांनी झोपडपट्टी येथील रहिवाशी शेख सलीम उर्फ बाबू जमदार ग्रामपंचायत सदस्य यांना कलम 5,5(क )9,9(अ )आणि वन्य प्राणी संरक्षण कायदा सहकलम 11(ड )प्राण्यांना निर्दयतेने वागणूक या कायद्याखाली अटक केली, सर्व गुरांना म्हैसपूर येथील गोशाळेत पाठविले. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग साहेब यांच्या तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, सपोनि. विजय चव्हाण,अंमलदार रवींद्र खंडारे, अब्दुल मजित, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, भीमराव तिडके, अशोक सोनोने,चालक प्रशांत कमलकर यांनी केली आहे.

Previous articleके-वायसी करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेबाहेर महिलांची गर्दी.
Next articleपुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.