Home Breaking News राणेनगर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

राणेनगर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

आज के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या राणेनगर शैक्षणीक संकुलात 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहन संस्थेचे *विश्वस्त लक्ष्मणनाना जायभावे* यांच्या हस्ते तर ध्वजपूजन मोरवाडी ग्रामस्थ व चारही युनिटचे मुख्याध्यापक यांनी केले. तत्पूर्वी हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहण मोरवाडी चे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय महादेव आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले मुख्य कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विद्यालयाचे प्राचार्य  प्रदीप सांगळे सर यांनी केले त्यात त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व प्रकट केले संस्थेचे विश्वस्त श्री लक्ष्मण नाना जायभावे व माजी विश्वस्त भास्कर नाना सोनवणे यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा यावेळी दिल्या .यावेळी शासन आदेशानुसार गोदावरी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. यावेळी उपस्थित संस्थेचे माजी विश्वस्त  भास्कर नाना सोनवणे, दत्तात्रय आव्हाड, बाळासाहेब सोनवणे ,नामदेव सोनवणे, मनोहर जायभावे ,के के सानप ,प्रभाकर सोनवणे, तुकाराम सोनवणे ,दिलीप सोनवणे ,साहेबराव आव्हाड, शांताराम जायभावे ,प्रकाश चकोर, अशोक सांगळे ,गोपाळजी आव्हाड ,रमेश गामणे, भिमाजी जायभावे ,राहुल सोनवणे ,शिवाजी बरके, बाळासाहेब आव्हाड, सुरज चव्हाण ,गोविंद आव्हाड, शिवाजी तडाखे ,रामभाऊ घुगे व इतर मान्यवर यामध्ये चारही युनिटचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी तसेच विद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मराठी मध्यम मुख्याध्यापक  विलास सांगळे यांनी केले.

Previous articleपु.अहिल्यादेवी‌ होळकर यांना गोदाआरतीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
Next articleके-वायसी करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेबाहेर महिलांची गर्दी.