Home Breaking News पु.अहिल्यादेवी‌ होळकर यांना गोदाआरतीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पु.अहिल्यादेवी‌ होळकर यांना गोदाआरतीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

राजमाता पु अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित नाशिक गोदावरी रामकुंडावर पु.अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या २२९व्या पुण्यतिथी निमित्त राजमाता गोदाआरती समर्पित करुन अहिल्यादेवींना त्यांच्या २२९व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. समितीमार्फत मातोश्रींच्या जन्मोत्सवापासून ते पुण्यतिथी पर्यंत अनेक कार्यक्रम घेण्यात आली मातोश्रीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त 300 मूर्ती वाटप करून हा वर्षभर हे काम करत आहेत या वेळी हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती आयोजित अहिल्या घाट पंचवटी या ठिकाणी मातोश्रींच्या पुण्यतिथीनिमित्त अहिल्या आरती गंगा गोदावरी आरती करण्यात आली. या ठिकाणी हजारो भाविकांनी या आरतीचा सहभाग घेतला. मातोश्रींनी नासिक पंचवटी या ठिकाणी अहिल्या घाट बांधून ठेवला काशी विश्वेश्वराची स्थापना केली. व्यायाम शाळा बांधली तसेच संपूर्ण भारतभर धार्मिक ठिकाणी घाट मंदिरे बांधून ठेवली. त्र्यंबकेश्वर मध्ये मंदिराची जीर्णोद्धार केला. चांदवड या ठिकाणी रंगमहाल होळकर वाडा रेणुका माता ची स्थापना केली. गंगापूर गावापासून ते रामकुंड पंचवटी या ठिकाणापर्यंत मातोश्रींनी धर्मशाळा व्यायामशाळा घाट बांधले यानिमित्त प्रास्ताविक समाधान भाऊ बागल प्रहार जिल्हा चिटणीस समाजसेवक यांनी काही काही दिवसापूर्वी झालेल्या घाटाच्या तोडफोड संदर्भात त्यावेळी मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला. माजी नगरसेवक राजेंद्र भाऊ बागुल यांनी पुण्यतिथ निमित्त मातोश्रींच्या केलेल्या कार्याच्या इतिहासाचा उल्लेख केला. या ठिकाणी जर घाटाचे काम परत चालू झाले तर आत्मदहनाचा इशारा राजेंद्र बागुल यांनी दिला. पुरोहित महासंघाचे सतीश शुक्ला गुरुजी यांनी रामकुंड पंचवटी अहिल्या घाट, रामकुंड पंचवटी चे चे महत्व सांगितले , याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जी कोथमिरे, विनायक काळदाते, दत्तू भाऊ बोडके, शिवाजी ढगे,वैभव रोकडे,भूषण जाधव, राजाभाऊ बादाड, अमोल गजभार सर,देवराम भाऊ रोकडे,नासिक शहर प्रमुख शाम गोसावी, डॉ.कल्पेश शिंदे पंढरीनाथ कोरडे,रामेश्वर भाऊ खनपटे , असंख्य जनसमुदाय उपस्थित होता.

‌‌या प्रसंगी ,पु.अहिल्यादेवींच्या धार्मिक तसेच सामाजिक कामकाजाचे स्मरण करण्यात आले तसेच पुरोहित संघाने आपल्या स्थानांच्या व परंपराच्या रक्षणासाठी उचललेल्या पावलांबद्दल अभिमान व्यक्त करण्यात आला.

Previous articleवाहनांच्या धडकेत काकांचा मृत्यू. पुतणी गंभीर.वाडेगाव रस्त्यावरील घटना
Next articleराणेनगर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा