Home Breaking News भोकर येथील ओबीसी मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे.

भोकर येथील ओबीसी मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे.

👉 जरगेवाड यांचे प्रतिपादन

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 10 ऑगस्ट 2024

प्रा. लक्ष्मण हाके सर यांच्या भोकर येथील मोंढा मैदान येथे 18 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्यास हिमायतनगर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे प्रतिपादन हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृह येथे दिनांक 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिमायतनगर ओबीसी तालुका अध्यक्ष बाबाराव जरगेवाड यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना विनंती केली आहे. या बैठकीत सर्वच हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपस्थित दर्शविली होती. भोकर येथील ओबीसी मेळाव्यास किमान शंभर गाड्या मधुन लाखोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याची त्यांनी विनंती केली आहे. त्याच अनुषंगाने हिमायतनगर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी स्वयंस्फुर्तीने प्रत्येक कार्यकर्त्याने एक ते दोन गाडी बाधुन मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी मोठा उत्साह दाखवुन शंभर गाड्यामधुन भोकर येथील ओबीसी मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी नियोजन केले आहे.

Previous articleसिरजंनी येथील सरपंच बहिणीची मुख्यमंत्री भावाला मायेची राखी…
Next articleवाहनांच्या धडकेत काकांचा मृत्यू. पुतणी गंभीर.वाडेगाव रस्त्यावरील घटना