Home Breaking News आदिवासीयांना मुख्य प्रवाहात आणन्याचा  प्रयत्न झाले पाहिजे युवराज पवार

आदिवासीयांना मुख्य प्रवाहात आणन्याचा  प्रयत्न झाले पाहिजे युवराज पवार

शेगाव (वार्ता ) येथून जवळच् असलेल्या वरदडी गावात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला होता .त्यावेळी समशेरसिंग आदिवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते युवराज पवारांनी फासे पारधी समाज आणि मुळ अदिवासी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले तरच विकास होईल असे सांगितले .वरदडी येथे दि . ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . तसेच त्या औचित्याने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यात चित्रकला ‘ ‘गायन चित्रकला , भाषण ‘ नृत्य ‘ हस्ताक्षर स्पर्धाचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक आदिवासी फासेपारधी मुलांनी सहभाग नोंदविला होता . त्यात आदिवासी नेते क्रांतीकारी यांचे चरित्रपर भाषणे झाली . विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला यावेळी आदिवासी शाळेचे अध्यक्ष . युवराज पवार तसेच उपस्थित मध्ये शाळेचे कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक युवा सेनाचे अध्यक्ष किसन आसाबे यांनी वनवासी क्रांतीकारी यांचे जीवन विषद केले . तसेच युवराज पवार भाषणात म्हणाले की – जंगलाचे मुळ रहिवासी फासेपारधी समाज शिकारी करीत जगत आला दालअपेष्टा आणि गुन्हेगारीचा शिक्का बसल्याने समाज स्विकारत नाही मुलांना शिक्षण घेणे गरजेचे असते परंतू त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास समाज प्रशासन यांनी पुढे आले पाहिजेत अन्यथा हीच पिढी पुन्हा गुन्हेगारीच्या मार्गावर पायवाट करेल ! त्यासाठी सर्वांनी मदतीसाठी पुढे आले पाहिजेत असे त्यांनी सांगितले . यावेळी शाळेच्या सचिव सौ. रत्ना पवार . यांचेही समयोजित भाषणं मार्गदर्शन झाले . उपस्थित सदस्य म्हणून गजानन खरात मधुकर आसाबे उपाध्यक्ष सौ. प्रमिला पवार .इंद्रराज पवार ‘ सुभाष पवार ‘ शक्तीमान पवार ‘ अविनाश भोसले ‘ निकेश पवार ‘ मथुरा पवार ‘ विद्यामान पवार ‘ जगदीश पवार ‘सौ राजकुमारी पवार . गीता पवार ‘निलीमा भोसले , चंद्रकला भोसले , पंचफुला भोसले आदी उपस्थित राहून कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले .

Previous articleआज जलंब व पहुरजीरा येथे आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या संकल्पनेतुन शासकीय योजनांचे नोंदणी शिबीर..
Next articleसिरजंनी येथील सरपंच बहिणीची मुख्यमंत्री भावाला मायेची राखी…