हिमायतनगर (अंगद सुरोशे ) – हिमायतनगर नगरपंचायत ही विविध कारणांनी सतत चर्चेचा विषय होतच असते हे सर्वश्रुत आहेच. अशातच नगरपंचायत च्या सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यासाठी दि ९ ऑगस्ट रोजी हिमायतनगर नगरपंचायत पुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की नगरपंचायत हिमायतनगर अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या अपुऱ्या असून त्यामध्ये त्यांचा गुजारा होत नाहीये. यासाठी सफाई कामगारांनी आपल्या संघटनेद्वारे नगरपंचायत समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये त्यांनी सफाई कामगारांना जॉब कार्डचे वाटप करा दुष्काळी कामे काढा व सहाशे रुपये हजेरी करा.
तसेच दारिद्र्यरेषेचा सर्वे करा. अल्पभूधारक निराधार मजूरदार बेघरांना घरकुल द्या व पिवळ्या रेशन कार्डचे वाटप करा. लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांची भरती करा. मागास प्रवर्गातील शेकडो कुटुंब न. नं ४२ अ मालकी हक्क नसल्यामुळे शासकीय योजनांपासून वंचित आहेत त्यांना त्वरित मालकी हक्क देऊन घरकुलाचे वाटप करण्यात यावे. अशा मागण्या धरणे सफाई कामगार आंदोलनकर्त्यांच्या आहेत.