Home Breaking News ओबिसी विभाग भोकर काॅग्रेस तालुकाध्यक्ष पदी उल्लेवाड यांची निवड!

ओबिसी विभाग भोकर काॅग्रेस तालुकाध्यक्ष पदी उल्लेवाड यांची निवड!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 08 जुलै 2024

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बि. आर. कदम यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहुन आणि प्रामाणिकपणे काम करणा-या कार्येकर्त्याला तालुका स्तरावर पदे देऊन पक्षसंघटना वाढविण्यासाठी निवड केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भोकर तालुक्यातील मौजे नागापुर येथील मा. सरपंच बालाजी पांडुरंग उल्लेवाड यांची काॅग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी ओबीसी विभाग भोकर काॅग्रेस तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र दिले आहे. बालाजी उल्लेवाड यांची निवड होताच त्यांना काॅग्रेस कार्यकर्त्यांनी अभिनंदनचा वर्षाव केला आहे.
पेरकेवाड समाज संघटनेचे हिमायतनगर तालुका सचिव तथा जिल्हा संपादक मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर यांनी त्यांना भ्रमणध्वनीवर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleयुवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे …राष्ट्रीय अध्यक्ष ; गणेश कचकलवार
Next articleसफाई कामगार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी हिमायतनगर नगरपंचायत पुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरु