गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.. .. अमोल भगत पोलीस निरीक्षक
अंगद सुरोशे
तालुका प्रतिनिधी हिमायतनगर
हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीं महिन्यापुर्वी दरोड्याचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्य़ातील हवे असलेल्या तिन आरोपीस पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडून अटक केली आहे. हि कारवाई शनिवार ता. ३ करण्यात आली आहे हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल हायवेवर सरसम जवळ फिर्यादी प्रल्हाद भाऊराव मिराशे यांची मोटारसायकल अडवून अँड्रॉइड मोबाईल नगदी रक्कम एकुण मुद्येमाल असा २५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरला होता. व तसेच पोटा बु. जवळील मनिषा आश्रम शाळेजवळ एका मुलाचा मोबाईल फोन नगदी रक्कम एकुण ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या अश्या स्वरूपाच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या सह अन्य रोड राॅबरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध हिमायतनगर पोलीस घेत होते. दरम्यान ता.३ शनिवारी गुप्त माहितीवरून व तांत्रिक पद्धतीने पोलीसांनी तपास करीत बोरगडी रोड व पळसपूर टि पाॅइंन्ट येथून आरोपी लखन विनोद पिंपळे वय २३ वर्ष रा. विठ्ठलवाडी हिमायतनगर, कुनाल उर्फ विक्की वैजनाथ बोडावार वय २४ वर्ष रा. दत्तनगर नांदेड, विजय तुकाराम अडबलवाड वय २५ वर्ष रा. तरोडा बु. नांदेड या तिन आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली असून गुन्हयात वापरलेला चाकू व रोख रक्कम ४ हजार दोनशे रूपये पोलीसांनी जप्त केले आहेत. हि कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती निता कदम, मसपोउपनि श्रीमती कोमल कांगणे, पोहेकाॅ श्याम नागरगोजे, पोना. पवन चौदंते यांनी ही उल्लेखनीय कामगीरी केली आहे.