Home Breaking News पारस ग्रामपंचायत भोंगळ कारभार

पारस ग्रामपंचायत भोंगळ कारभार

अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम तिडके यांचा आदोलनाचा इशारा

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ८८८८८७२८५४
अकोला – बाळापुर तालुक्यातील पारस ग्रामपंचायतचा भोगंळ कारभार सुरू असून नागरीकांचे हाल होत आहेत.पारस प्रकल्पाला लागून असलेल्या एकता नगरमध्ये समस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या चा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल असुन शाळेतील मुलांना शाळेत जाण्याकरिता खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे या चिखला मधून त्यांना शाळेत ये जा करावी लागते. त्यांना चालण्याचा मार्ग सुद्धा नाही नागरिकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चिखलचा सामना करा लागत आहे नागरिकांचे दुचाकी, चारचाकी वाहने त्यांना दूरच उभ्या करावा लागत आहेत. त्यामुळे चोरीची दाट शक्यता सुद्धा आहे ग्रामपंचायत पारस सरपंच व सदस्यांना वारंवार सांगून , कुठल्याच प्रकारची कारवाई सुद्धा करण्यात आली नाही या संपूर्ण समस्याला अधिकारी लोकांनी बारकयीने चौकशी करून एकता नगर नागरिकांचे समस्या मार्गी लावावी अन्यथा अशोका फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष , शुभम पंजाबराव तिडके, व समस्त एकता नगर तील नागरिक तिव्र आंदोलन छेडतील असा इशारा दिला यावेळी उपस्थित एम.डी राहील इर्शादअहमद, संतोष भाऊ ,अजहर अहमद, विशाल भाऊ ,शेख रफिक, नितीन पोहरकर, आरिफ खान ,सचिन सुरवसे,इत्यादी समस्त एकता नगर तील नागरिक उपस्थित होते

Previous articleपदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाशिक शिक्षण विभागावर खडे बोल व सुक्ष्म अभ्यासातून समस्यावर कार्यवाही .
Next articleदरोड्याच्या गुन्हयातील तीन आरोपीस अटक ; हिमायतनगर पोलीसांची कामगीरी. …